आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडा अन् T20 लीग खेळा, IPL संघमालकांकडून खेळाडूंना 50 कोटींची ऑफर!
IPL 2023 : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, यूएई येथे होणाऱ्या टी 20 लीग स्पर्धेत आयपीएलमधील संघमालकांचे संघ आहेत
IPL 2023 : आयपीएलला जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखले जाते. या स्पर्धेचा सोळावा हंगाम सुरु आहे. 2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्राला सुरुवात झाली होती, तेव्हापासून या स्पर्धेत अनेक बदल झाले आहेत. आयपीएलमधील संघमालकांनी इतर देशातील लीग स्पर्धेतही गुंतवणूक केली आहे. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, यूएई येथे होणाऱ्या टी 20 लीग स्पर्धेत आयपीएलमधील संघमालकांचे संघ आहेत. त्यामुळे आयपीएलमधील संघ मालकांनी काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून लीग स्पर्धा खेळण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची बोलणी झाल्याचे समजतेय. टाइम्स लंडन यांनी याबाबतचे वृत्त दिलेय.
मिळालेल्या वृत्तानुसार, आयपीएलमधील काही संघ मालकांनी इंग्लंडच्या सहा खेळाडूंना ५० कोटींची ऑफर देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून एक वर्षासाठी T20 लीग खेळण्यासाठी करार करण्याची ऑफर देण्यात आली आहे. अनेक फ्रँचायझी खेळाडूंना वर्षभराच्या करारावर साईन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या करारानुसार खेळाडूंना वर्षभर वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळावे लागणार आहे. इंग्लंडसह वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलच्या संघ मालकांकडून ऑफर देण्यात आली आहे.
आयपीएलचे संघ खेळाडूंना प्रत्येक हंगामानुसार करारबद्ध केले जाते. प्रत्येक हंगामाआधी लिलाव केला जातो. मात्र आता खेळाडूंसोबत वार्षिक करार करायण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी इंग्लंडच्या ६ दिग्गज खेळाडूंसोबत संपर्क साधण्यात आला. यावर प्रस्तावावर वर्षाअखेरपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकते. यासाठी त्यांना 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या (फिका) रिपोर्टनुसार इंग्लंडच्याच खेळाडूंन नाही तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनादेखील अशा प्रकारचे प्रस्ताव मिळत आहेत. याबाबत लवकरत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
कोणत्या खेळाडूंना आयपीएलमधील कोणत्या फ्रेंचायझीने संपर्क साधला, याबाबत रिपोर्ट्समध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. पण रिपोर्ट्सनुसार, जर एखाद्या खेळाडूने संघ मालकाचा हा करार स्वीकारला तर संबंधित फ्रेंचायझी ही त्याची पूर्णपणे मालक असेल. जर त्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे असतील तर आयपीएल फ्रेचांयजीकडून परवानगी घ्यावी लागेल. सध्या फुटबॉलमध्ये हेच सुरु आहे. फूटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटमध्येही करार केले जाणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, सध्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक देशाचे खेळाडू त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या परवानगी घेतात. पण जर फ्रेचांयझीने खेळाडूंना वार्षिक करार केला तर उलटे होईल.
No comments